जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत सोने लंपास; फुले दांपत्यावर गुन्हा

 स्थैर्य, सातारा, दि.१0: शाहूनगर परिसरातील मंगळाई कॉलनीमधील महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केल्याप्रकरणी दांपत्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाळकृष्ण फुले (रा. मंगळाई कॉलनी) व त्यांच्या पत्नीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उषा रामचंद्र गायकवाड (रा. मंगळाई कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. काल साडेनऊच्या सुमारास त्या फुले दांपत्याने जातीवाचक शिवीगाळ करून मला व आईला मारहाण केली. तसेच गळ्यातील तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले असे उषा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस अधिक्षक आंचल दलाल तपास करत आहेत.