वाईतील सोने चांदीच्या व्यापाऱ्यांने गळफास लावून घेऊन केली आत्महत्या

 


स्थैर्य, वाई, दि.१९: लक्ष्मी नारायण मार्केट मध्ये सोने चांदीचा व्यापार करणारे व्यापारी प्रमोद सुरेश ओसवाल(वय 34)यांनी घरगुती कारणावरून घरातच आज सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.


याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महेश सुरेश ओसवाल यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचा भाऊ प्रमोद सुरेश ओसवाल यांनी घरातच आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्या करण्याचे कारण पत्नी माहेरी गेलेली परत येत नाही असे म्हटले आहे.प्रमोद ओसवाल यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya